संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना वाढीव पोलीस कोठडी

बीड, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना १३ दिवसाची म्हणजे १८ जानेवारी पर्यंत वाढीव पोलीस कोठडी तर एकाला खंडणी प्रकरणी चार दिवसाची पोलीस कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकारणतील ७ आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.
मस्साजोग येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना आज केज येथील न्यायालयात हजर केले असता १३ दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून विष्णू चाटे याला खंडणी प्रकरणात ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ML/ML/SL
6 Jan. 2025