सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे होते आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांची घट्ट मैत्री होती.गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसोबतचे वैर संपण्याचे नाव घेत नाहीये.
आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.