पालखी मार्गावरील हजारो झाडे जगवून दाखवली सरकारी यंत्रणेने

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती-इंदापूर विभागातील NH 965G या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील 1,025 वटवृक्षांपैकी 85% यशस्वीरित्या पुनछरोपण करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटर द्वारे प्रसिद्ध केली आहे.
फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये आम्ही संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, महाराष्ट्र येथे NH 965G च्या बारामती-इंदापूर विभागावर स्थित वृक्षांचे पुन:रोपण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पादरम्यान, आम्ही 1,025 वटवृक्षांचे रस्त्यांच्या बाजूने यशस्वीरित्या पुन:रोपण करण्यात आले असून सध्या, पुनर्रोपित झाडांपैकी 870 (85%) जगली आहेत, असेही ते म्हणाले.
श्री गडकरी म्हणाले की, पुन:रोपण केलेली झाडे जोमाने वाढत आहेत या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण करण्यातच मदत झाली नाही तर रस्त्याने प्रवास करणाऱ्या पर्यटकांना एक आनंददायी दृश्य अनुभवही मिळाला आहे.
SL/KA/SL
2 May 2023