मियावाकीसाठी पालघरमध्ये हजारो झाडांची कत्तल

 मियावाकीसाठी पालघरमध्ये हजारो झाडांची कत्तल

पालघर, दि. ६ : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडण्यात येणार असल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. नाशिकसह राज्यभरातील पर्यावरण प्रेमी सरकार विरोधात एकवटले आहेत. त्याचत वृक्षतोडीबाबतची एक गंभीर घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. मियावाकी या वेगवाने झाडे वाढवण्याऱ्या जपानी पद्धतीच्या वृक्षलागवडीसाठी अनेक जुने वृक्ष तोडल्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पालघर तालुक्यातील दहिसर वनपरीक्षेत्रातील दुर्वेस गावाच्या हद्दीत हा गंभीर प्रकार समोर आला आहे. वनविभागाच्या जागेवर शासनाची दिशाभूल करून ‘मियावाकी जंगल’ उभारण्याच्या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या राखीव वन कंपार्टमेंट क्रमांक 167 मध्ये दोन हेक्टर क्षेत्रावर 44 हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी आधीच घनदाट असलेल्या आणि चार ते पाच फूट उंचीच्या झाडांची मोठ्या संख्येने कत्तल करण्यात आली आहे. लाखो झाडांच्या या कत्तलीसाठी जबाबदार असलेल्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे (FIR) दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मियावाकीच्या मर्यादा

मियावाकी जंगल झपाट्याने वाढते, पण नैसर्गिक जंगलासारखे शेकडो वर्षे टिकणारे संतुलन साधणे कठीण असते. टीकाकारांचे म्हणणे आहे की ही पद्धत दाट जंगलाचा त्वरित देखावा निर्माण करते, पण खोलवर रुजलेली, स्वतः टिकणारी परिसंस्था तयार करण्यावर कमी भर देते. त्यामुळे दीर्घकालीन परिसंस्था स्थिरता कमी राहते. या पद्धतीत मातीची विशेष तयारी, रोपे खरेदी, लागवड आणि सुरुवातीच्या १–२ वर्षांत नियमित पाणी, तणनियंत्रण व छाटणी यासाठी मोठा खर्च येतो. विशेषतः कोरड्या भागात ही पद्धत संसाधन-ग्रहण करणारी ठरते. झाडे खूप जवळ लावल्यामुळे स्पर्धा वाढते. काही प्रजाती जलद वाढतात तर काही मागे पडतात, त्यामुळे जैवविविधतेत असंतुलन निर्माण होऊ शकते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *