यंदा चंद्रभागातिरी टेंट हॉस्पिटल आणि बाईक ॲम्बुलन्स

 यंदा चंद्रभागातिरी टेंट हॉस्पिटल आणि बाईक ॲम्बुलन्स

सोलापूर दि २३ – पंढरपूर कडे निघालेल्या पालखी मधील आतापर्यंत जवळपास तीन लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे तसेच या वारी काळामध्ये वाळवंट परिसरात टेन्ट हॉस्पिटल ही संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

दरवर्षी आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर सरासरी 50 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होत असते मात्र यंदाच्या काळात अद्याप पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचण्यापूर्वीच सर्व पालखी मार्गावरील तीन लाख वारकऱ्यांची तपासणी झाल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले. वारी काळामध्ये पंढरपूर मध्ये मोठी गर्दी असते . या काळात आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी चंद्रभागा नदीच्या दोन्ही काठाला वाळवंटात टेंट हॉस्पिटल ही नवीन संकल्पना आपण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि लाईफ सपोर्ट सिस्टमही वारकऱ्यांना मिळतील. तसेच दहा बेड उपचारासाठी या ठिकाणी ठेवले जातील.This year Chandrabhagatiri Tent Hospital and Bike Ambulance

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी पंढरपूर शहराची वाखरी गोपाळपूर आणि तीन रस्ता या तीन ठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबिराच्या तयारीची पाहणी केली. आणि आवश्यक त्या सूचना केल्या.

ML/KA/PGB
23 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *