यंदाही काश्मिर खोऱ्यात ३ ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार

गणपती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या धुमधड्याक्यात साजरा केला जातो. गेल्या वर्षीपासून तो काश्मीर खोऱ्यातही साजरा व्हायला लागला आहे. यंदाही सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून या मंडळांना येत्या शनिवारी (दि. ३१) पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती सुपूर्द करण्यात येणार आहेत. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.