यावर्षी देखील गोगलगाईचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव….

 यावर्षी देखील गोगलगाईचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव….

लातूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मृगाच्या पावसाने दगा दिल्यानंतर काही प्रमाणात लातूर जिल्ह्यात पाऊस झाला. शेतकऱ्यांनी जमेल तसा पेरा केला मात्र अचानक शेतात गोगलगायीचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली वाढलीय.This year also a big outbreak of snails again….

लातूर जिल्ह्याच्या कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना भेटी देऊन याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून पावसाचे उशिरा आगमन झाल्याने केवळ 35 टक्के पेरण्या झाल्याचं त्या म्हणाल्या. चुकीच्या वातावरणामुळे यापैकी 5 ते 10 टक्के क्षेत्र गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विभागाने याबाबत गावागावात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून गॉगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चुन्याचे पट्टे, मिठाच्या पाण्यात गोगलगाई गोळा करून् त्याचा नायनाट करणे यासारखे उपाय शेतकऱ्यांना सांगितले जात आहेत.

दरम्यान कृषि विभागाच्या सल्ल्याने आम्ही गोगलगाईचा नायनाट करीत असून प्रदूभाव वाढतच असल्याने शेतीचे नुकसान् होत असल्याचे जिल्ह्यातील शेतकर सांगत आहेत.

ML/KA/PGB
10 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *