ही जगप्रसिद्ध कंपनी तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

 ही जगप्रसिद्ध कंपनी तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगप्रसिद्ध Amazon कंपनी आता आर्थिक अनिश्चिततेचे कारण देत 18,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे, अशी माहिती खुद्द सीईओ अॅंडी जॅसी यांनी दिलीय. बुधवारी जॅसी यांनी कर्माचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीपासून कर्माचारी कपात करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉनकडून घोषीत करण्यात आलं आहे. या कर्माचारी कपातीचा मोठा फटका इ-कॉमर्स आणि मानव संसाधनला बसणार असल्याचं जॅसी यांनी म्हटलं आहे. अॅमेझॉनच्या ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. त्यांच्याकडे जवळपास ३ लाख कॉर्पोरेट कर्मचारी नोकरीवर असल्याची माहिती आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेसाठी वार्षिक प्लॅनिंग खूप कठीण जाणार आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून कर्माचाऱ्यांची मोठी भरती करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले आहेत.

SL/KA/KA

5 Jan 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *