हे घडणार या वेबसीरिजच्या पुढच्या सीझनमध्ये

 हे घडणार या वेबसीरिजच्या पुढच्या सीझनमध्ये

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) ओटीटी विश्वाने त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग कमी वेळात निर्माण केला आहे. उत्तमोत्तम आणि खिळवून ठेवणारा कन्टेन्ट हे त्यामागचे कारण मानले जाते. अशाच उत्कंठावर्धक मालिकांपैकी ज्या काही मालिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यातील एक म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स. या मालिकेचा आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. आता नव्या सीझनची चाहते वाट पाहत आहेत.

अतुल कुलकर्णी, अभिनेत्री प्रिया बापट, सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या सिटी ऑफ ड्रीम्सच्या टीझरनं प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. खिळवून ठेवणारे रंजक कथानक, लक्ष्यवेधक संवाद आणि उस्फुर्त अभिनय यामुळे या मालिकेच्या आतापर्यतच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

तिसऱ्या सीझनमधून गायकवाड कुटूंबीय आणि त्या घरातील राजकारण किती भयानक आहे,वेळप्रसंगी ते किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे दिसून येणार आहे. निर्मात्यांनी देखील यावेळी प्रेक्षकांना खूप काही गोष्टी कळणार आहेत. असे म्हटले आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. गायकवाड कुटूंबियांचे महाराष्ट्रासोबतचे नाते अजुनही संपलेले नाही. अशी कॅप्शन त्या व्हिडिओला देण्यात आली आहे. त्याची चर्चा आहे.

या मालिकेच्या निमित्तानं अभिनेते सचिन पिळगावकर आणि अतुल कुलकर्णी यांनी मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही गेल्या एक ते दीड वर्षांपासून शुटींगला सुरुवात केली होती. आता आम्हाला असे विचारले जाते की, यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काही भाष्य करण्यात आले आहे का, त्यावर अभिनेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मालिकेपासून राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. अशा त्यांच्या प्रतिक्रियेचा सूर होता.

TM/KA/SL

26 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *