हा ठरणार Re-Release होणारा पहिला मराठी चित्रपट

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा बहिणींच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला महिला वर्गाचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. ५० दिवसांत या चित्रपटाने जगभरात ९० कोटींहून अधिक कमाई केली. असा हा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होतं आहे. मराठी सिनेसृष्टीतील हा पहिलाच चित्रपट, पुन: प्रदर्शित होतं आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले तसेच ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित, रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब चौधरी, आणि सुकन्या कुलकर्णी मोने अभिनीत, साई – पियूष द्वारे संगीतबद्ध केलेले संगीत, वैशाली नाईक द्वारे लिखित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ ७ मार्च २०२५ पासून चित्रपटगृहात पुनःप्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
‘बाईपण भारी देवा’चं भारतातील एकूण कलेक्शन हे तब्बल ७६.५ कोटींचं होतं, तर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर ‘बाईपण भारी देवा’ने नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेतच त्यात अजून एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा प्रदर्शित होणारा सध्याच्या काळातील हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
SL/ML/SL
14 Feb. 2025