परप्रांतियांना जमीन विक्री नाहीच , कोकणातील या गावाचा निर्धार

चिपळुण, दि. १२ : कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकामासाठी निसर्गाचा मोठा ऱ्हास होत आहे. त्याचबरोबर येथील जमिनी मोठ्या प्रमाणात परप्रांतियांना विकल्या जात आहेत. स्थानिक मध्यस्थांचाच या जमिनी विकण्यात मोठा हात असल्याचे वारंवार दिसून येते. असे असताना चिपळुण तालुक्यातील एका गावाने पुढाकार घेत आपल्या जमिनी परप्रांतियांना न विकण्याचा निश्चय केला आहे.
चिपळुण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीने हा अतिशय स्तुत्य आणि धाडसी निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक्तीलाठरावाची प्रत जमीन खरेदी-विक्रीची नोंदणी करणाऱ्या दुय्यम सहायक निबंधक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याशिवाय याबाबत जनजागृती होण्यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत. जमिन विकायचीच झाल्यास गावातील लोकांनाच विकावी असे ठरवण्यात आले आहे. ठरावाची प्रत जमीन खरेदी-विक्रीची नोंदणी करणाऱ्या दुय्यम सहायक निबंधक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याशिवाय याबाबत जनजागृती होण्यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत.
गावातील जमिनी परगावातील लोकांना विकल्यानंतर विविध समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेत जमिनी परगावातील लोकांना न विकण्याचा ठराव केला आहे. सचिंता जाधव, सरपंच, मोरवणे.