कोकणातील या गावाचा नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

 कोकणातील या गावाचा नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

चिपळूण, दि. २१ : राज्यातील २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. या निवडणूकीवर चिपळूण तालुक्यातील एका गावाने एक महत्त्वाची अट घालून बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे. चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांसमोर एक अनोखी मागणी ठेवली आहे. सध्या ही मागणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीसाठी गावात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

तळवडे या गावाने नेटवर्कच्या मूलभूत सुविधेसाठी थेट मतदानाचा संबंध जोडला आहे. यावेळी गावात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे. गावात फुकट फिरू नका, नेट द्या… मत घ्या!, नेट दिलात तरच वोट…, अशा आशयाचे अनेक बॅनर सध्या गावात झळकत आहेत. आज 5G च्या जमान्यातही तळवडे गाव मोबाईल नेटवर्कपासून पूर्णपणे वंचित आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखी शक्कल लढवली आहे.

यावेळी नो नेटवर्क, नो एंट्री अशा आशयाचा हा इशारा देऊन तळवडेकरांनी राजकीय नेत्यांना सडेतोड संदेश दिला. जोपर्यंत गावात नेटवर्क येत नाही, तोपर्यंत केवळ आश्वासनांवर मत मिळणार नाही, असे थेट इशारा तळवडे ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान हा बॅनर गावातील तरुणांनी लावलेला असून संपूर्ण गावाने त्याला समर्थन दिले आहे

या गावात नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबले आहे. अंगणवाडी शिक्षिका आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना ऑनलाइन कामे पूर्ण करण्यासाठी तीन ते चार किलोमीटर दूर रेंज शोधावी लागते. तसेच गावातील लोकांचा आरोग्य, आपत्कालीन आणि सामाजिक संपर्क तुटला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *