पाकीस्तानी अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटावर बंदी

 पाकीस्तानी अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटावर बंदी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता देशभर पाकीस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने पाकच्या नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या अबिर-गुलाल हा येत्या ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. अनेक चित्रपटगृहे फवादचा हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नव्हती आणि अनेक मनोरंजन संस्थांनी त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. आता मंत्रालयानेही त्याच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

या बाबत मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले , . “पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे,”

SL/ML/SL

24 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *