बिग बॉस’ फेम अभिजीत बिचकुलेला या विद्यापीठाने दिली डॉक्टरेट
मुंंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी, हिंदी बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेला अभिजीत बिचुकले अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहत असतो. बिचकुले यंदाच्या लोकसभा निवडणुकीही लढवणार आहे. लवकरच तो मतदारसंघही जाहीर करणार आहे. दरम्यान त्याला डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती त्याने स्वतःच जाहीर केली आहे. मॅजिक आणि आर्ट यूनिवर्सिटीकडून अभिजीत बिचुकलेला डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. कला व मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी डॉक्टरेट पदवी मिळाली आहे
.या बाबत बिचुकले म्हणाला, “या यूनिवर्सिटीचे फाऊंडर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये आले होते. ते जादूगार आहेत आणि ते विद्यापिठाचे प्रमुख आहेत. ते मला म्हणाले, बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही जी काही धमाल उडवून दिली. तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, महाराष्ट्रात राहता आणि मराठीत तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देत आहोत. तुम्ही स्वीकार करालं? असं विचारलं. त्यामुळे मी डॉक्टरेट पदवी स्वीकारली.” डॉक्टरेट मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत बिचुकले म्हणाला “आनंदाचा क्षण आहे की, लोक, यूनिवर्सिटी, विद्यापीठ माझी दखल घ्यायला लागले आणि हे सारं काही माझ्या कर्मामुळे घडलं. माझं कर्म चांगलं आहे.”
आपल्या आजवरच्या वाटचालीबाबत बोलताना बिचकुले म्हणाला, “२३ मे १९९६ रोजी म्हणजे सरासरी २८ वर्षांपूर्वी क्षितिज नावाचा मी एक बालकविता संग्रह प्रकाशित केला. तेव्हा मी अवघ्या २० वर्षांचा होतो, तिथून माझा प्रवास सुरू झाला. तुमच्यासारख्या माध्यमांना माझा प्रवास माहितीच आहे. मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी तिथे जाऊ ठसा उमटवला. सातारा जिल्ह्याची म्हणा संपूर्ण मी आयडेंटीटी बनलो. सातारा जिल्हा, महाराष्ट्र हा जगाच्या नकाशावरती नेण्यामध्ये माझं योगदान आहे. त्यामुळे या यूनिवर्सिटीने माझ्याशी संपर्क साधला. ते विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते. त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ही डॉक्टरेट दिली आहे. आता इथूनपुढे आपण डॉक्टर अभिजीत वामनराव आव्हाडे-बिचुकले असं लावू शकतो. ही पदवी आपल्याला स्व-कष्टाने आणि स्व-कर्माने यूनिवर्सिटीने दखल घेऊन मिळाली आहे.”
SL/ML/SL
24 March 2024