कर्नाटकातील या मंदिराचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश

बंगळुरू, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ २०२३ च्या यादीत कर्नाटकातील होयसाळेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे .हे मंदिर कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात म्हैसूर विमानतळापासून अंदाजे १५० किमी अंतरावर आहे. होयसाळेश्वर मंदिर उंच चबुतर्यावर बांधलेले असून या चबुतर्यावर १२ कोरीव थर आहेत.होयसाळ वास्तुकलेचा हा उत्तम नमुना आहे.कारण या १२ थरांना जोडण्यासाठी चुना,सिमेंट किंवा इतर कोणतीही सामग्री वापरलेली नाही.
येथील कोरीवकाम एखाद्या मशिनच्या मदतीने देखील होणार नाही इतके थक्क करणारे आहे. या मंदिराची निर्मिती ११२१ मध्ये करण्यात आली आहे. होयसाळ राजाने त्यांच्या कारकिर्दीत सुमारे १५०० मंदिरे बांधली होती.यातील काही मंदिरे कर्नाटक राज्यात बेलूर,हळेबिडू आणि सोमनाथपुरा भागात विखुरली आहेत.इसवी सन १० व्या ते १४ व्या शतकादरम्यान दक्षिण भारतीय होयसाळ साम्राज्य होते.
SL/ML/SL
28 May 2024