गहू उत्पादनात या राज्याचा प्रथम क्रमांक

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२०२३-२४ रब्बी हंगामात सर्वाधिकगहू उत्पादनाची राज्यनिहाय आकडेवारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये ३१. ०७ टक्के गहू उत्पादन झालं आहे. त्यामुळे गहू उत्पादनात उत्तर प्रदेशने पहिलं स्थान मिळवलं आहे. तर मध्यप्रदेश २१.३ टक्के वाट्यासह दुसऱ्या स्थानावर आहे.गहू उत्पादनात पंजाब १४.७ टक्के वाट्यासह तिसऱ्या स्थानावर आहे, हरियाणा १०% उत्पादनासह चौथ्या स्थानावर आहे. राजस्थान ९.६% उत्पादनासह पाचव्या स्थानावर आहे, तर बिहार ५.९% उत्पादनासह सहाव्या स्थानावर आहे.गुजरात ३.३% उत्पादनासह सातव्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्र १.९% उत्पादनासह आठव्या स्थानावर आहे. पश्चिम बंगाल ०६%, हिमाचल प्रदेश ०५% आणि झारखंड ०.४% उत्पादनासह अनुक्रमे नवव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानावर आहेत. तसेच छत्तीसगड सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. छत्तीसगडचा गहू उत्पादनामध्ये ०.२ टक्के वाटा आहे.
शेतकऱ्यांनी उष्णतेला अधिक सहन करणाऱ्या गहू वाणांची लागवड केली आहे. आणि जरी काही प्रमाणात उत्पादनावर परिणाम झाला तरी, क्षेत्रफळ मागील वर्षापेक्षा जास्त आहे, त्यामुळे उत्पादन अधिक होईल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु व्यापारी सरकारच्या अंदाजाला नाकरत आहेत.दरम्यान, गहू उत्पादक राज्यांमध्ये नवीन गहू काढणीला सुरूवात झाली आहे. बाजारात नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. १ मार्चपासून अनेक राज्यांमध्ये गव्हाची सरकारी खरेदी सुरू झाली आहे.कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, २०२४-२५ हंगामात देशातील गहू उत्पादनाचा लक्ष्य ११५ लाख टन ठेवण्यात आलं आहे. लागवडीखालील क्षेत्रातील वाढ आणि उत्पादकतेच्या अपेक्षेने उत्पादनाच्या प्रमाणात मोठी वाढ होईल, असा सरकारचा दावा आहे. परंतु काही हवामान तज्ञांनी तापमान वाढीमुळे गहू उत्पादनावर आणि गुणवत्तावर होणाऱ्या परिणामाची चिंता व्यक्त केली होती.
SL/ML/SL
14 March 2025