SBI च्या या विशेष ठेव योजनेवर मिळतेय जबरदस्त व्याज
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसबीआयने ‘अमृत कलश’ ही विशेष एफडी योजना पुन्हा सुरू करून गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. अमृत कलश ही SBI द्वारे ऑफर केलेली विशेष FD योजना आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देण्यात येते. त्याचा परिपक्वता कालावधी ४०० दिवसांचा आहे.आता गुंतवणूकदार या विशेष एफडीमध्ये ३० जून २०२३ पर्यंत गुंतवणूक करू शकतात.
SBI च्या ‘अमृत कलश’ विशेष FD योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली होती.SBI ने ही योजना १५ फेब्रुवारी २०२३ ला लाँच केली. त्यानंतर ही योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत खुली होती. आता बँकेने १२ एप्रिल रोजी पुन्हा ती सुरू केली आहे. ही ३० जून २०२३ पर्यंत खुली आहे. या योजनेत २ कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर व्याज भरण्याचा पर्याय मिळेल. प्राप्तिकर कायद्यांतर्गत या योजनेवर टीडीएस लागू आहे. तसेच या योजनेमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची किंवा त्याच्या आधारावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
SL/KA/SL