RRR मधील हे गाणे ठरले Golden Globe चे बेस्ट ओरिजनल सॉंग
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजमौली दिग्दर्शीत RRR चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे आता परदेशातही नावलौकीक कमावला आहे. अनेक नामवंत पुरस्कार पटकावलेल्या या चित्रपटाला अजून एक जागतिक महत्त्वाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये पार पडलेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात RRR मधील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजन सॉंग हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नाटू नाटू हे तेलगु भाषेतील गाणे एम. एम. किरवाणी यांनी कंपोज केले आहे. राहूल सिप्लीगंज आणि काल भैरवा यांनी गायलेले हे गाणे एनटी रामाराव ज्युनिअर आणि रामचरण यांच्या धम्माल डान्स परफॉर्मन्सवर चित्रित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RRR च्या या जागतिक पातळीवरील यश संपादनाबद्दल दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे कौतुक केले आहे.
SL/KA/SL
11 Jan 2023