या शेर्पाने केले २७ व्यांदा माऊंट एव्हरेस्ट काबीज

 या शेर्पाने केले २७ व्यांदा माऊंट एव्हरेस्ट काबीज

काठमांडू, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वोच्च शिखर असलेले हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न जगातील सर्वच पट्टीचे गिर्यारोहक पाहतात. खडतर हवामानावर मात करून अनेकजण एव्हरेस्ट सर देखील करतात. परंतु अनेकांसाठी आयुष्यात एकदाच घडणारी ही घटना नेपाळी शेर्पा अगदी सहज पार पाडत असतात. त्यांच्या सहकार्या आणि मार्गदर्शनाखालीच गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिम यशस्वी करत असतात. कामी रीता शेरपा यांनी एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर तब्बल २७ वेळेस सर केले आहे. यावेळी त्याने स्वतःचाच २६ वेळा एव्हरेस्ट सर केल्याचा विश्व विक्रम मोडला आहे.

कामी रीता यांचा जन्म १७ जानेवारी १९७० रोजी डोंगराळ भागात असलेल्या सोलुखुंबू गावात झाला. याच गावात तेनसिंग नोर्गे यांचे घर होते. ज्यांनी एडमंड हिलरीसोबत पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले होता.
तरुणपणात कामीला बौद्ध भिक्खू बनायचे होते आणि त्यांनी काही काळ एका मठात घालवला पण नंतर त्यांनी आपला विचार बदलला.

कामीने पहिल्यांदा १९९२ मध्ये एव्हरेस्टवरील बेस कॅम्पवर स्वयंपाकी म्हणून काम सुरू केले. एका रिपोर्टनुसार, वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सामान पोहोचवायला सुरुवात केली.

नंतर १९९४ मध्ये, वयाच्या २४ व्या वर्षी, त्यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली आणि तेव्हापासून जवळजवळ दरवर्षी ते जगातील सर्वोच्च शिखर चढत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *