Google ची ही सेवा २०जूनला होणार बंद

 Google ची ही सेवा २०जूनला होणार बंद

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google कडून दिली जाणारी एक सेवा 20 जून 2024 पासून कायमची बंद होणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. Google One VPN Service) सेवा बंद करण्यात येणार आहे. गूगलने यापूर्वी सांगितले होते की ते गूगल वन वीपीएन सेवा बंद करण्याची तयारी करत आहे. मात्र, कंपनीने त्यावेळी तारीख जाहीर केली नव्हती. गुगलने 4 वर्षांपूर्वी 2020 मध्ये ही सेवा सुरू केली होती. आता 4 वर्षांनंतर ही सेवा बंद होत आहे.व्हीपीएन हे एक आभासी खाजगी नेटवर्क आहे, जे तुमचे इंटरनेट कनेक्शन अधिक सुरक्षित करते.व्हीपीएन तुमचा आयपी पत्ता एन्क्रिप्ट करतो. जेणेकरून तुम्ही इंटरनेटवर काय पाहत आहात हे कोणालाही कळणार नाही.

गूगल वन वीपीएन बंद करण्याची सूचना आता गूगल वन वीपीएन ॲपवर देखील दिसत आहे.गूगलने गूगल वन वीपीएन कसे अनइन्स्टॉल करायचे हे देखील स्पष्ट केले आहे. गूगलने वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टममधून ही सेवा कशी अनइन्स्टॉल करायची ते स्पष्ट केले आहे.

गूगल वन वीपीएन सेवेसाठी वापरकर्त्यांना 1.99 डाॅलर (165 रुपये) खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत वापरकर्ते ही सेवा वापरत नव्हते. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीकडे ही सेवा बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. ही सेवा अँड्रॉइडसोबत आयओएस, मॅक आणि विंडोजवर उपलब्ध होती. भारतीयांना गूगल वन वीपीएन सर्व्हिस सेवेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. याचे कारण म्हणजे ही सेवा भारतात कधीच सुरू झाली नव्हती.

SL/ML/SL

23 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *