ही मालिका ठरली यावेळची टीआरपी रेटिंगमधील नंबर १ मालिका

 ही मालिका ठरली यावेळची टीआरपी रेटिंगमधील नंबर १ मालिका

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मनोरंजन विश्वात टीआरपीच्या बाबतीत कायमच चढ उतार चालू असतो. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. प्रेक्षकांचे मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील लक्ष लागलेले असते. त्याच्या चढ-उताराकडे लक्ष ठेवून प्रेक्षक बऱ्याचदा आवडीनिवडी बदलताना पण दिसतात. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या…

टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.This serial became the number 1 serial in TRP rating at that time

टीआरपी लिस्टमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
टीआरपीच्या शर्यतीत ‘स्वाभिमान’ ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.0 रेटिंग मिळाले आहे.
नव्या स्थानावर ‘अबोली’ ही मालिका आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे.
‘लग्नाची बेडी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.

‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या या मालिकेच्या महाएपिसोडला ६.५ रेटिंग मिळाले आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या महाएपिसोडला 4.9 रेटिंग मिळाले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला 2.6 रेटिंग मिळाले आहे. हलक्या-फुलक्या मालिकांना प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत हे टीआरपी रेटिंगमधून समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

ML/KA/PGB
27 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *