सनसायझर्स हैदराबादच्या कर्णधार पदासाठी या खेळाडूचे नाव चर्चेत

 सनसायझर्स हैदराबादच्या कर्णधार पदासाठी या खेळाडूचे नाव चर्चेत

मुंबई,दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मार्च 2023 मध्ये होणाऱ्या  IPL T- 20 क्रिकेट सामन्यांसाठी आता खेळाडूंचे लिलाव आणि संघ रचनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यातच सन रायझर्स हैदराबाद या संघाच्या कर्णधारपदावरून केन विल्यमसनला मुक्त करण्यात आल्यानंतर आता या संघाच्या कर्णधारपदी कोण येणार याची उत्सुकता लागून राहीली आहे. आयपीएलच्या नव्या सीजनसाठी मिनी लिलाव येत्या 23 डिसेंबरला कोची येथे पार पडणार आहे. लिलावासाठी एकूण 404 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.  याबरोबरच हैदराबादचा नवा कर्णधार कोण असेल हे देखील दोन दिवसात स्पष्ट होईल.

पंजाब किंग्सचा माजी कर्णधार मयंक अग्रवालवर सनरायझर्स हैदराबाद संघाची जबाबदारी देण्याचा विचार होऊ शकतो. गेल्या आयपीएलमध्ये मयंक अग्रवालने पंजाब किंग्सकडून 13 सामने खेळले आणि त्याला केवळ 196 धावा करता आल्या. मात्र 2018 मध्ये मयंक अग्रवाल पहिल्यांदा पंजाब किंग्जशी जोडला गेला होता, तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली होती. आयपीएल 2022 मधील पंजाब किंग्जचा प्रवास सहाव्या स्थानावर संपला होता. आता या संघाच्या कर्णधारपदावरून मयंकला मुक्त करण्यात आले आहे.

SL/KA/SL

20 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *