नवीन वर्षात Instagram वर मिळणार हे नवीन फिचर

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तरुणाईच आवडत Instagram सोशल मिडिया प्लँटफॉर्म आता नव वर्षानिमित्त नवीन फिचर घेऊन आलं आहे. Insta ची ओनर कंपनी मेटा आता स्टोरी सेक्शनसाठी एक विशेष अपडेट देणार आहे. Unseen Story Highlights असे याचे नाव आहे. सध्या या फिचरची चाचणी सुरु आहे.
नवीन फिचरच्या नावावरून असे वाटतं की, या फीचरच्या मदतीने युजर्सला अशा लोकांच्या स्टोरी पाहायला मिळतील ज्यांना तुमच्याकडून सुटल्या असतील टेकक्रंचच्या अलीकडील अहवालानुसार, हे स्टोरी हायलाइट्स बुझच्या स्टोनरी सेशनाच्या शेवटी दिसून येईल. जे अॅपच्या शीर्षस्थानी वेगळ्या सेक्शनमध्ये दिसेल. नवीन फीचरबाबत मेटा कंपनीने सांगितलं की, “आम्ही नेहमी नवीन गोष्टींवर काम करत असतो. ज्यामुळे लोकांना स्टोरीजमधून कनेक्ट करता येईल. तसेच स्टोरी ट्रेच्या शेवटी अलीकडील हायलाइट्स शेअर करत असतो.”
आता इंस्टाग्राम स्पॉसर्ड पोस्ट आणि रॅडम रिल्सने भरलेले आहे, यात हे नवीन फीचर बरेच उपयुक्त ठरू शकते. कारण ते युझर्सच्या मित्रांची नवी अपडेट देण्याचा एक जलद मार्ग उपलब्ध करून देईल. कंपनीने असेही म्हटलं की, या फीचरच्या मदतीने युझर्स गेल्या आठवड्यातील न पाहिलेले स्टोरी सुद्धा हायलाइट्समध्ये पाहू शकतील.
SL/ML/SL
26 Dec. 2024