बँकेत लिपिक संवर्गासाठी वापरले जाणार हे नवीन पदनाम
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक पदाचे नाव बदलण्यात आले आहे. लिपिकाचे सध्याचे पदनाम बदलून “कस्टमर सर्व्हिस असोसिएट” (CSA) करण्यात आले असून पदनामातील हा बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. मूळ अधिसूचनेच्या सर्व अटी आणि शर्ती सारख्याच राहतील आणि पुढील अपडेट IBPS च्या वेबसाईटवर दिले जातील, असं नोटिसमध्ये म्हटलं आहे.
अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपिक संवर्गाच्या पदनामात बदल करण्यात आला आहे. लिपिकाचे सध्याचे पदनाम बदलून “कस्टमर सर्व्हिस असोसिएट” (CSA) करण्यात आले आहे.
पदनामातील हा बदल दिनांक 01.04.2024 पासून लागू होणार आहे. त्यानंतर, CRP CLERK-XIV ला CRP-CSA-XIV (कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स (CSA) भरतीसाठी सामायिक भरती प्रक्रिया) म्हणून समजून घेतले जाईल आणि वाचले जाईल.”याशिवाय 1 जुलै 2024 च्या नोटिशीमध्ये इतर सर्व माहितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही नोटीसमध्ये कळविण्यात आले आहे. बाकीची माहिती तशीच राहील.
SL/ML/SL
7 Nov. 2024