या नेत्याने नाकारले राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण
कोलकाता, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ६ हजारहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशभरातील महत्त्वाच्या सेलिब्रिटी व्यक्ती, राजकारणी आणि संतमहंतांना यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या अभूतपूर्व सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी सर्वजण उत्सुक असले तरीही पश्चिम बंगालमधील एका ज्येष्ठ नेत्याने या सोहळ्याचे निमंत्रण मिळूनही उपस्थित राहणे नाकारले आहे.
सीपीआय(एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले आहे. पक्षाने मंगळवारी 26 डिसेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे. त्यामुळे निमंत्रण मिळूनही ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
सीपीआय(एम)चे पक्षाने एका पोस्टमध्ये लिहिले आहे धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे, ज्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये.पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, भाजप आणि आरएसएसने एका धार्मिक कार्यक्रमाचे सरकारी कार्यक्रमात रूपांतर करणे दुर्दैवी आहे, ज्यामध्ये पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर सरकारी अधिकारी थेट सहभागी होत आहेत.भारतात राज्यकारभाराचे मूळ तत्त्व आहे. राज्यघटनेनुसार भारतात राज्यकारभाराला कोणताही धार्मिक संबंध नसावा. सत्ताधारी पक्ष त्याचे उल्लंघन करत आहे.
अभिषेक झाल्यानंतर देशभरातील 545 लोकसभा जागांमधून सुमारे 2.5 कोटी लोकांना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत आणले जाईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून 5-5 हजार लोकांना वेगवेगळ्या तारखांना येथे आणले जाईल. सुमारे 3 महिन्यांत 1 कोटी लोकांची दर्शन-पूजा पूर्ण होणार आहे.
SL/KA//SL
26 Dec 2023