ही आहे जगातील सर्वांत श्रीमंत गायिका

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार रिहाना जगातील सर्वात श्रीमंत महिला गायिका, संगीतकार बनली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सहाशे मिलियन डॉलर्स कमावून रिहानाने इतर तमाम महिला गायिकांना मागे टाकत हा किताब प्राप्त केला आहे. 600 मिलियन डॉलर्स कमावून रिहाना फोर्ब्सच्या या रिपोर्टमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅडोना स्थानावर आहे, जिची एकूण कमाई 570 दशलक्ष डॉलर एवढी आहे. तिसरा नंबर बियॉन्सेचा लागतो, जिच्याकडे 400 मिलियन डॉलरची संपत्ती आहे.
‘इंडिया टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिहाना तिची गाणी, ब्यूटी ब्रँड, अंतर्वस्त्राचा ब्रँड आणि म्युझिक टूर्समधून मोठी कमाई करते. याशिवाय ती इन्स्टाग्राम पोस्ट व गाण्यांच्या रॉयल्टीमधूनही पैसे कमावते. ‘फोर्ब्स’च्या रिपोर्टनुसार, रिहानाची एकूण संपत्ती ११,००० कोटी रुपये आहे. ती सर्वात श्रीमंत महिला संगीतकार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी व त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आजपासून जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना परफॉर्म करणार आहे. रिहाना या सोहळ्यासाठी गुरुवारी जामनगरमध्ये पोहोचली आहे.
SL/KA/SL
2 March 2024