ही ठरली भारतातील सर्वांत फायदेशीर स्टार्टअप कंपनी

मुंबई, दि. ९ : २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६२३ कोटींचा निव्वळ नफा OYO ही देशातील सर्वांत फायदेशीर स्टार्टअप कंपनी झाली आहे. हॉटेल आणि ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म देणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १७२% जास्त नफा कमावला आहे.
कंपनीच्या कागदपत्रांनुसार, OYO Statupचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २२९ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २५ मध्ये ६२३ कोटी रुपयांवर पोहोचला, ज्यामुळे वार्षिक १७२% वाढ झाली. अशाप्रकारे कंपनीने नफ्याच्या बाबतीत इतर अनेक स्टार्टअप्सना मागे टाकले आहे. शेअरहोल्डर्सनाही हे वर्ष खूप चांगले गेले, कारण ओयोची प्रति शेअर कमाई (EPS) ०.३६ वरून ०.९३ पर्यंत वाढली. ही तब्बल १५८% वाढ आहे.
गेल्या वर्षभरात OYO ने भारत, सौदी अरेबिया, युएई आणि आग्नेय आशियासह विविध प्रदेशांमध्ये ३० हून अधिक संडे हॉटेल्स लाँच करत व्यवसाय विस्तार केला आहे.