हे आहे महाराष्ट्रातील पहिले गुलाबांचे गाव

सातारा, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील एक गावाने हे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव असा नावलौकिक मिळवला आहे. सातारा जिह्यातील पारपार गाव हे महाबळेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. या गावाला आता गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ही संकल्पना मांडली, आणि ग्रामपंचायत पारपारने ती स्वीकारली. पारपार गावाच्या या नव्या ओळखीमुळे, पुस्तकांचे गाव भिलार आणि मधाचे गाव मांघर यांच्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील हे तिसरे विशेषत्व प्राप्त करणारे गाव ठरले आहे.
गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच, गुलाबांच्या लागवडीमुळे पर्यावरणीय आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुलाबांच्या फुलांचे उत्पादन आणि विक्री स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते, तसेच पर्यटकांच्या वाढीमुळे गावातील रोजगाराच्या संधी वाढू शकतात.पारपार गावाच्या या उपक्रमामुळे, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे, जो इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
SL/ML/SL
22 Feb. 2025