ही तर काँग्रेसची केंद्राकडील वाटचालीची सुरवात
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९७७ साली देशात काँग्रेसचा सर्वत्र पराभव झाला होता. पण १९७८ साली कर्नाटक व आंध्र या राज्यांनी विधानसभेत काँग्रेसला प्रचंड यश मिळवून दिले होते. पुढे ८० साली काँग्रसला लोकसभेत ३२५ जागा मिळाल्या. दक्षिणेतील राज्य काँग्रेसला जेंव्हा यश मिळवून देतात तेंव्हा देशात काँग्रेस लाटेची सुरवात होते हा इतिहास आहे.
ईडीगीरीद्वारा देशात भयावह वातावरण निर्माण करणार्या मोदी सरकारला उघडपणे नव्हे तर मतपेटी द्वारा आपण प्रतिकार करू शकतो हा संदेशही कर्नाटक जनतेने दिला आहे असे मत काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी आम अनंत गाडगीळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. गाडगीळ सध्या अमेरीकेच्या दैोर्यावर आहेत .
ML/KA/SL
14 May 2023