राजकारण नाही, हा निव्वळ अपघात – शरद पवारांकडून स्पष्ट
बारामती, दि. २८ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यानंतर दिल्ली येथे असलेले पवार कुटुंबिय तातडीने बारामती येथे दाखल झाले. बारामतीतील शोकाकूल नागरिकांना अजित दादांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. याच वेळी या अपघाताबद्दल प्रसारमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत यामध्ये कोणतेही राजकारण नसून हा निव्वळ अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार म्हणाले की, अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
शरद पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली. रन वेवर असतानाच शरद पवारांनी ही माहिती घेतली. अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर ‘रन वे’ ज्या ठिकाणी संपतो त्याच्या आधी एक किमी अंतरावर विमानाचा अपघात झाला. त्या ठिकाणी असलेल्या बाजूच्या खोलगट भागात हा अपघात झाल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आलं.
SL/ML/SL