ही आहे भारताची पाचवी स्कॉर्पीन पाणबुडी
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची पाचवी स्कॉर्पीन पाणबुडी ‘वगीर’ आज नौदलाकडे सूपूर्द करण्यात आली. प्रोजेक्ट-75 अंतर्गत, 4 स्कॉर्पीन श्रेणीच्या अति-आधुनिक पाणबुड्या INS कलवरी, INS खांदेरी, INS करंज आणि INS वेला सध्या भारतीय नौदलाला सेवा देत आहेत.
आता यांच्या जोडीला आयएनएस वगीरची सागरी चाचणी पूर्ण होऊन ती देखील नौदलाच्या सेवेत दाखल झाली. आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सहावी आणि शेवटची स्कॉर्पीन पाणबुडी INS वागशीर भारतीय नौदलात सामील होण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही कठोर चाचणीतून जाईल.
SL/KA/SL
20 Dec. 2022