IPL मधील चिअर लिडर्सना मिळते एवढे मानधन

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL 2024 च्या माहोल सध्या देशभर सुरु झाला आहे. महिनाभर दररोज एक क्रिकेट सामना पहायला मिळणे ही क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची (IPL) नेहमीच चर्चा असते.आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स या भारतीय आहेत, पण बहुतांश चीअरलीडर्स या विदेशी आहेत. चीअर लीडर्सना एका सामन्यासाठी 12 ते 20 हजार रुपये दिले जातात. त्याशिवाय त्यांच्या परफॉर्मनुसार विशेष बोनसही दिला जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलसाठी प्रत्येक संघ चीअर लीडर्सबरोबर करार करतो. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानुसार चीअर लीडर्सला सरासरी 12 ते 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक 12 हजार रुपये दिले जातात. राजस्थानकडून 14 ते 15 हजार रुपये दिले जातात. तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर 20 हजार रुपये दिले जातात. केकेआरकडून सर्वाधिक 22 हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात.
SL/ML/SL
26 March 20224