ही आहे फेमिना मिस इंडीया वर्ल्ड २०२३
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा किताब जिंकला आहे.तर दिल्लीच्या श्रेया पुंजा ही फर्स्ट रनर अप ठरली असून मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग ही दुसरी रनर अप ठरली आहे. मुंबईत झालेल्या एका शानदार समारंभात नंदिनी गुप्ताला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा मुकुट बहाल करण्यात आला. आता नंदिनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ग्रँड मिस वर्ल्ड स्पर्धेच्या ७१व्या आवृत्तीतही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
१९ वर्षांची नंदिनी गुप्ता ही कोटा येथील रहिवासी आहे. तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. रतन टाटा यांना नंदिनी तिच्या आयुष्यातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती आहेत. या विजयाबद्दल तिचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत तिने सोशल मीडियावर मनापासून भावना व्यक्त केल्या आहेत, “भारतातील कोटा या छोट्याशा शहरापासून ते जागतिक मंचापर्यंत, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 म्हणून मुकुट मिरवल्याबद्दल मी भारावून गेलो आहे आणि सन्मानित आहे!”
“मी जागतिक स्तरावर भारताच्या समृद्ध संस्कृती, विविधता आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे. मी ही पदवी कृपा, सन्मान आणि नम्रतेने पार पाडण्याचे वचन देते,” असेही नंदितीने म्हटले आहे.
SL/KA/SL
18 April 2023