हा आहे धोनीच्या लेकीचा सिक्रेट सांता

 हा आहे धोनीच्या लेकीचा सिक्रेट सांता

दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : नुकत्याच कतार येथे पार पडलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला.जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. भारतात देखील अनेक फुटबॉल प्रेमी अर्जेंटिनाच्या विजयानं खुश झाले. आता फुटबॉल फीवर पासून भारतीय खेळाडूसुद्धा वेगळे राहू शकले नाही. पण यात एक पोस्ट खास लक्ष्यवेधी ठरली. फुटबॉल वर्ल्डकपमधील विजयानंतर मेस्सीच्या सहीची जर्सी घेण्यासाठी चाहत्यांकडून स्पर्धा सुरू झाली आहे. जय शाहपाठोपाठ आता भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची मुलगी झिवा हिला मेस्सीकडून स्पेशल जर्सी मिळाली आहे.

नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एमएस धोनी आणि साक्षीची मुलगी झिवानं अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे.
साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, लियोनेल मेस्सीनं ज्या जर्सीवर साइन केली आहे. झिवाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘लाइक फादर, लाइक डॉटर’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. झिवाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी झिवाच्या या फोटोला कमेंट केली आहे. तर अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे.
एमएस धोनी देखील आहे फुटबॉलप्रेमी
महेंद्र सिंह धोनी हा फुटबॉलप्रेमी आहे. धोनी हा शाळेत शिकत असताना फुटबॉल खेळत होता. त्यामुळेच झिवानं तिच्या फोटोला ‘लाइक फादर, लाइक डॉटर’असं कॅप्शन दिले असेल.
झिवा सोशल मीडियावर सक्रिय असते. झिवाला 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

TM/KA/SL

28 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *