AI मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार ही भारतीय कंपनी

 AI मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार ही भारतीय कंपनी

AI

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI हा सध्या जगभरातील परवलीचा शब्द झाला आहे. भविष्यातील याची आवश्यकता हेरुन मोठ्या कंपन्या आता यामध्ये अधिक संशोधनासाठी प्रचंड गुंतवणूक करण्यास सज्ज झाल्या आहेत. IT क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी Wipro आता कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास पुढाकार घेत आहे.पुढील 3 वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये $1 अब्ज किंवा सुमारे 8,230 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली असल्याची माहिती या कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे.

या गुंतवणुकीसह, Wipro कंपनी AI च्या विस्तारावर (विस्तार), बिग डेटा आणि अॅनालिटिक्स सोल्यूशन्स, तसेच नवीन संशोधन आणि विकास आणि प्लॅटफॉर्मच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. विप्रोने AI-फर्स्ट इनोव्हेशन इकोसिस्टम ‘Wipro ai360’ लाँच केले आहे. तसेच येत्या 12 महिन्यांत सुमारे 2,50,000 कर्मचाऱ्यांना AI वर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) थियरी डेलापोर्ट म्हणाले, “आम्ही आता जनरेटिव्ह एआयच्या आगमनानंतर सर्व उद्योगांसाठी मूलभूत बदलाची अपेक्षा करतो.” कंपनी क्लाउड सेवा, सायबर सुरक्षा, अभियांत्रिकी आणि डिझाइनसह चार जागतिक व्यवसाय क्षेत्रांमध्ये 30,000 डेटा विश्लेषणे आणि AI तज्ञांना नियुक्त करेल.

SL/KA/SL

12 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *