22 वर्षांनंतर पुन्हा रिलिज झाला आहे हा हिंदी चित्रपट

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर कथानक असलेला सनी देओलच्या दमदार अभिनयाने रंगलेला ‘गदर’ हा चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. देशप्रेम,प्रेमकथा, रोमान्स, सनी देओल स्टाईल हटके फायटींग, सुमधुर गाणी यांची रेलचेल असलेल्या या चित्रपटाने २२ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. आता सनी देओलचा ‘गदर’ हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर’ या चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
जुन् गदर चित्रपटाचा शुक्रवारी दिल्ली, जयपूर आणि लखनऊमध्ये प्रीमियर झाला. दरम्यान अभिनेता सनी देओल चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी दिल्लीच्या पीव्हीआर थिएटरमध्ये पोहोचले. येथे सनी यांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सनी थिएटरमध्ये दिसत आहे. यादरम्यान तेथे उपस्थित असलेले चाहते सनी यांना पाहून खूप खुश झाले. यावेळी सनी ग्रे ब्लेझरमध्ये दिसले. त्यांनी यावेळी पगडी बांधली होती. सनी यांनी चाहत्यांच्या विनंतीवरुन ‘हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा’ हा प्रसिद्ध डायलॉग म्हटला.
या चित्रपटातही तेच चेहरे मुख्य पात्रांमध्ये दिसणार आहेत. पण अशरफ अली यांची भूमिका चित्रपटात नसेल. ही भूमिका दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी साकारली होती. या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल, सिमरत कौर, लव सिन्हा आणि मनीष वाधवा देखील दिसणार आहेत.
SL/KA/SL
10 June 2023