आता सर्व स्मार्टफोन्समध्ये असणार हे सरकारी ॲप
नवी दिल्ली, दि. १ : केंद्रीय दूरसंचार विभागाने मोबाईल हँडसेटच्या उत्पादकांना आणि आयातदारांना संचार साथी – Sanchar Saathi हे सरकारी अॅप सर्व नवीन उपकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत प्री-इंस्टॉल केलेले असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवणारा मानला जात आहे. २८ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार, आदेश जारी केल्यापासून ९० दिवसांनंतर भारतात उत्पादित किंवा आयात केलेल्या सर्व मोबाइल फोनमध्ये हे अॅप असणे आवश्यक आहे. देशात वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) हा मोठा निर्णय घेतला आहे आता भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे ‘Sanchar Saathi’ ॲप आधीपासूनच इंस्टॉल असणे बंधनकारक असेल. आतापर्यंत हे ॲप वापरणे ऐच्छिक होते पण आता ते काढता येणार नाही आणि बंद करता येणार नाही अशी अट घातली गेली आहे. हा नियम फक्त नवीन फोनपुरता मर्यादित नाही आधीच तयार केलेल्या आणि दुकानदारांकडे असलेल्या फोननाही सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे ॲप आपोआप मिळणार आहे.
मोबाईल कंपन्यांसाठी DoT चे स्पष्ट निर्देश
- पुढील 3 महिन्यांत Sanchar Saathi प्री-इंस्टॉल करणे आवश्यक
- फोन सुरू करताना ॲप चे आयकॉन लगेच दिसले पाहिजे
- ॲप डिसेबल किंवा अनइंस्टॉल करता येणार नाही
- 120 दिवसांत अंमलबजावणीचा अहवाल सरकारला द्यावा लागेल
“केंद्र सरकार येथे निर्देश देते की भारतात वापरण्यासाठी असलेल्या मोबाइल हँडसेटच्या प्रत्येक उत्पादक आणि आयातदाराला… या सूचना जारी झाल्यापासून ९० दिवसांपासून, दूरसंचार विभागाने निर्दिष्ट केल्यानुसार, संचार साथी हे मोबाइल अॅप्लिकेशन भारतात वापरण्यासाठी उत्पादित किंवा आयात केलेल्या सर्व मोबाइल हँडसेटवर प्री-इंस्टॉल केलेले आहे याची खात्री करा,” असे आदेशात म्हटले आहे.
वापरकर्त्यांना असा होईल फायदा
- फोन चोरीला गेल्यास शोधणे सोपे होईल.
- सेकंड-हँड फोन सुरक्षितरीत्या खरेदी करता येईल.
- फसवे कॉल आणि मेसेजविरुद्ध तक्रार करणे सोपे होईल.
- सायबर सुरक्षेत वाढ
SL/ML/SL