या महाऔष्णिक विद्युत केंद्राची शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल

चंद्रपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, CSIR-NEERI यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे (अलगी/शेवाळ) साठवणूक करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूट प्रिंट्सचा अंदाज आणि त्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने हाती घेतलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.
या प्रकल्पाला भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) निधी दिला आहे. या करारनाम्यावर (MoA) गिरीश कुमारवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि डॉ. अमित बाफना, प्रमुख शास्त्रज्ञ CSIR-NEERI, नागपूर यांनी डॉ. विश्वजीत ठाकूर प्रमुख वैज्ञानिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आहे. तानाजी यादव, प्रादेशिक अधिकारी चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रांची कार्बन उत्सर्जन शून्यतेसाठी वचनबद्धता पूर्ण करण्याकरीता एक उदात्त हेतू साध्य करण्याची ही अद्भुत संधी दिल्याबद्दल चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) आभारी मानले आहेत.
भारताचे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR-NEERI), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महानिर्मिती (महाजनको) चे डॉ. पी. अनबलगन, मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संजय मारुडकर संचालक (संचलन), डॉ. धनंजय सावळकर संचालक (खनिकर्म), बाळासाहेब थिटे संचालक (वित्त).
अभय हरणे संचालक (प्रकल्प), पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (संवसू-२), डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) आणि राजेश पाटील कार्यकारी संचालक (संवसू-१) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वीज केंद्र शून्य कार्ब उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
SL/KA/SL
24 Nov. 2023