२९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर

मुंबई, दि. २१ : सरकारने ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर केल्यानंतर लुडो क्लासिकसारखे ऑनलाइन गेम बनवणारी कंपनी नझारा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत एकूण २९% घसरण झाली आहे. Nazara Technologies चे रिअल मनी गेम्सशी अप्रत्यक्ष व्यवहार आहेत. कारण पोकर कंपनी मूनशाईन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांचा ४६.०७ टक्के हिस्सा आहे.
या विधेयकात भारतात कोणत्याही प्रकारच्या रिअल मनी गेम (आरएमजी) आणि त्यांच्याशी संबंधित जाहिरातींवर बंदी घालण्याची तरतूद आहे. याशिवाय, भारतात आरएमजी देणाऱ्या कोणालाही तीन वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. तसेच, बँकिंग संस्थांना अशा आरएमजी कंपन्यांसोबत काम करण्यास बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे.