ही Edu Tech कंपनी देणार २०० कोटींची शिष्यवृत्ती
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची युनिकॉर्न एड-टेक कंपनी, फिजिक्स वाला म्हणजेच PW, भारतभरात नवीन तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन केंद्रे, PW विद्यापीठ सुरू करीत आहे. विद्यार्थ्यांना पीडब्ल्यूएनएसएटी 2023 म्हणजेच, फिजिक्स वाला नॅशनल स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट 2023 द्वारे 100%पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी आहे. पीडब्ल्यू द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना 200 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. PW एनएसएटी परीक्षा 1, 8 आणि 15 ऑक्टोबर 2023 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल आणि विद्यार्थी 1 ते 15 ऑक्टोबर 2023 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील.
परीक्षेसाठीची नोंदणी ही, PW वेबसाइट, अॅप किंवा जवळच्या ऑफलाइन विद्यापीठ केंद्रावर 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.ही परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार असून, ही परीक्षा सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच जेईई किंवा नीटसाठी अभ्यास करू इच्छिणाऱ्या ड्रॉपर्ससाठी खुली असेल.
पीडब्ल्यूचे विद्यापीठ ऑफलाइनचे सीईओ अंकित गुप्ता म्हणाले, “कोविड-19 नंतर शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. विद्यार्थी आता ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचा लाभ घेतात. पीडब्ल्यू येथे, आम्ही मिश्रित दृष्टिकोनावर पुढील मार्ग म्हणून ठाम विश्वास ठेवतो. शहरांमध्ये आमच्या तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन विद्यापीठ केंद्रांचा विस्तार करून, आमचे ध्येय हे, विद्यार्थ्यांना त्यांच्याच शहरात दर्जेदार शिक्षण मिळणे सुनिश्चित करणे आहे, जेणेकरून त्यांना दूरच्या शहरांमधील शिक्षण केंद्रांमध्ये स्थलांतरित होण्याची आवश्यकता नाहीशी होईल.आमच्या विद्यार्थ्यांना अधिक सहाय्य पुरवण्यासाठी, आम्ही आमच्या पीडब्ल्यूएनएसएटी परीक्षेद्वारे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. गेल्या वर्षी, 1.1 लाख विद्यार्थ्यांना 120 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या पीडब्ल्यूएनएसएटी शिष्यवृत्तीचा लाभ झाला होता. हीच परंपरा पुढे चालू ठेवत यावर्षी आम्ही 200 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देत आहोत.”
SL/KA/SL
5 Sept. 2023