या दिवशी आहे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2023 या वर्षातील शेवटचे ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन अमावस्येला होणार आहे. हे ग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिक सारख्या देशांमध्ये दिसणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.
सर्वपित्री अमावस्या 14ऑक्टोबर, शनिवारी आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. पितृ पक्षात सर्व पितृ अमावस्येला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे याला शनी अमावस्याही म्हटले जाईल.
विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पृथ्वीचा काही भाग दिवसाच्या प्रकाशात काही काळ गडद दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते.
2023 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी झाले.
SL/KA/SL
6 Oct. 2023