माकडांनी हल्ला केल्यास हा देश देणार नुकसान भरपाई

 माकडांनी हल्ला केल्यास हा देश देणार नुकसान भरपाई

छायाचित्र प्रातिनिधीक

बँकॉक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णकटीबंधात असलेल्या जगातील महत्त्वाच्या पर्यंटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना मोकाट माकडांचा उपद्रव सहन करावा लागतो. पर्यटकांच्या खाण्याच्या वस्तू, मोबाईल कॅमेरे पळवणे हे माकडांचे उच्छाद नेहमीच चालू असतात. त्यातच काहीवेळा चिडखोर माकडांनी हल्ला केल्यामुळे पर्यटक जखमी झाल्याच्या घटनाही घडतात. याबाबत महत्त्वाची भूमिका घेत थायलंड सरकारने माकडांचा हल्ला झालेल्या पर्यटकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधून आलेल्या एका पर्यटक महिलेवर माकडांनी हल्ला चढवल्याने ती गंभीर जखमी झाली या प्रकरणाची तत्काळ दखल घेत पर्यटकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मांकडांचा हल्ला झालेल्या पर्यटकांना थायलंडचे सरकार उपचारासाठी 69691 रुपये देणार आहे. माकडांच्या हल्ल्यामुळे पीडित व्यक्ती काम करण्याच्या स्थितीत नसेल तर त्याला 180 दिवसांपर्यंत प्रतिदिन 699 रुपये दिले जाणार आहेत. माकडांच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर संबंधिताच्या परिवाराला 2.33 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. ही योजना वन्यजीव संरक्षण कार्यालयाकडून राबविली जाणार आहे.

SL/ML/SL

18 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *