‘या’ देशाने घातली मुस्लिमांवर प्रवेश बंदी

प्योंगयांग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर कोरिया हा देश जो हुकूमशहा किम जोंग-उनच्या अमानुष आणि विचित्र निर्णयांमुळे सतत चर्चेत असतो. उत्तर कोरिया, किम जोंग-उनच्या राजवटीत, परदेशी धर्म विशेषत: इस्लामचे पालन करण्यास कठोरपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. देश अधिकृतपणे नास्तिक असला तरी, धार्मिक प्रथा सामाजिक गोष्टींना बाधा आणू नये किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू नये, यासाठी इथे इस्लाम धर्माचे पालन करण्यास किंवा नव्यानं मुस्लिम समाजातील नागरिकांना इथे प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसा कायदाच या देशाने बनवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियामध्ये सध्या सुमारे तीन हजार मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे पूजेसाठी मशिदी नाहीत. राजधानी प्योंगयांगमधील इराणी दूतावास संकुलात एकमेव मशीद आहे आणि ती प्रामुख्याने दूतावासात राहणाऱ्या इराणी लोकांसाठीच आहे. उत्तर कोरिया आणि इराणमध्ये मजबूत राजनैतिक संबंध आहेत.पण प्रामुख्याने इस्लामबद्दल कोणत्याही प्रकारे बोलण्यासही या देशात बंदी आहे.
नियम मोडला तर अर्थातच हुकूमशहा किम जोंग-उनकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. जी शिक्षी इथे प्रत्येला कोणताही नियम मोडल्यास भोगावी लागते ती म्हणजे मृत्यदंड. असं म्हटंल जातं की उत्तर कोरियामध्ये इस्लामबद्दल कोणतीही चर्चा झाल्यास किंवा केल्यास त्या व्यक्तीला थेट मृत्यूलाही सामोर जावं लागू शकतं.
SL/ML/SL
7 Dec. 2024