ढेकणांच्या नायनाट करण्यासाठी या देशाने दिला कोट्यवधींचा निधी

सेऊल, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पूर्व आशियातील द. कोरिया या देशाला सध्या एका विचित्र समस्येनं ग्रासलं आहे. दक्षिण कोरियाची राजधानी ढेकणांचं संकट ओढवलं आहे. सेऊलवर सेऊलमध्ये ढेकणांचा उच्छाद वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या उद्रेकामुळे इथल्या सेऊलमधल्या अधिकाऱ्यांना चक्क ढेकणांशी दोन हात करावे लागत आहेत. याच्या नियंत्रणासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दक्षिण कोरियाच्या सेऊल, बुसान आणि इंचॉन शहरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ढेकणांचे १७ उद्रेक झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. सेऊल प्रशासनाने ढेकणांशी लढण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे. तसेच याविरोधात लढण्यासाठी तब्बल ५०० मिलियन वॉन (३.८३ लाख डॉलर्स/ ३ कोटी १९ लाख रुपये) इतका निधी बाजूला काढून ठेवला आहे. याआधी फ्रान्स आणि यूकेमध्येही ढेकणांची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा तिथल्या काही प्रदेशात ढेकणांची दहशत पसरली होती.
दक्षिण कोरियासाठी ढेकणांची समस्या नवी नाही. यापूर्वी दक्षिण कोरियाने १९६० साली देशव्यापी मोहीम हाती घेऊन ढेकूण नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तत्कालीन सरकार यशस्वीदेखील झालं होतं. परंतु, या समस्येनं आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
दरम्यान भारतासारख्या देशात ढेकूण ही सामान्य समस्या समजली जात असताना, कोरिया सारख्या देशात ही समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात हे विशेष म्हणावे लागेल.
SL/KA/SL
7 Nov. 2023