या देशाने केली 16 भारतीय कंपन्यांच्या औषधांवर आयात बंदी
मुंबई,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिकेतील देशांमध्ये खोकल्याच्या भारतीय सिरपमुळे मुलांच्या झालेल्या मृत्यूनंतर WHO ने यासंबंधीच्या सर्व औषधांबाबत चेतावणी जारी केली होती. यानंतर आपला शेजारी असलेल्या नेपाळ देशानी याची गंभीर दखल घेत 16 भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर बंदी घातली आहे. नेपाळ औषध नियामक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या यादीमध्ये रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसी या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीद्वारे पतंजली या ब्रॅंडने औषधांचे उत्पादन तयार केले जाते.
या कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांचं पालन करण्यात अपयशी ठरल्या. त्यामुळे या कंपन्यांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली.
नेपाळने बंदी घातलेल्या भारतीय औषध कंपन्या
- दिव्य फार्मसी
- रेडियंट पॅरेन्टेरल्स लिमिटेड
- मरक्युरी लेबोरेटरीज लिमिटेड
- एलायंस बायोटेक
- कॅपटॅब बायोटेक
- एग्लोमेड लिमिटेड
- जी लेबोरेटरीज लिमिटेड
- डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड
- जीएलएस फार्मा लिमिटेड
- यूनिजूल्स लाईफ साइंस लिमिटेड
- कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स प्राइवेट
- आईपीसीए लेबोरेटरीज लिमिटेड
- कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड
- डायल फार्मास्युटिकल्स, एग्लोमेड लिमिटेड
- मॅकुर लेबोरेटरीज लिमिटेड
- आनंद लाइफ सायंसेस लिमिटेड
SL/KA/SL
20 Dec. 2022