ही बनली जगातील सर्वांत मोठी स्टील कंपनी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : JSW स्टील कंपनीचे बाजार भांडवर 30 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. यासोबतच, कंपनी बाजार भांडवलाच्या आधारवर जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 30.31 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. कंपनीची स्टील उत्पादन क्षमता 35.7 दशलक्ष टन आहे, ती आर्थिक वर्ष 2028 पर्यंत 43.5 MT आणि आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 51.5 MT पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
या कंपनीचे बाजार भांडवत आता युनायटेड स्टेट्स आणि लक्झेंबर्गमधील नूकोर कॉर्प आणि आर्सेलरमित्तल यांसारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. Nucor Corp चे बाजार भांडवल सध्या 29.4 अब्ज डॉलर्स आणि आर्सेलरमित्तलचे बाजार भांडवल 27.1 अब्ज डॉलर आहे. याशिवाय, जेएसडडब्ल्यू स्टीलने भारतातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी टाटा स्टीलला (23.1 अब्ज डॉलर्स) देखील मागे टाकले आहे.
JSW स्टीलच्या शेअर्सच्या किंमतीत मागील काही वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले आहेत.
SL/ML/SL
27 March 2025