गेल्या काही वर्षांत तब्बल सात वेळा फोडली गेली ही बँक

चंद्रपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा चोरांचा प्रयत्न झाला असून गेल्या १५ वर्षात तब्बल ७ वेळा ही बँक फोडण्यात आली आहे. यातील काही प्रयत्न यशस्वी तर काही अपयशी ठरले आहेत .
नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या अगदी शेजारी ही बँक आहे, काल रात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान बँकेला लागून असलेल्या ग्रामपंचायत ची खिडकी तोडून चोरांनी बँकेत शिरण्याचा केला प्रयत्न, मात्र शेजारीच असलेल्या रमेश ठवरी यांच्या घराची कुत्री भुंकायला लागल्यामुळे त्यांनी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट केले, त्यामुळे या लोकांनी बँकेकडे धाव घेताच चोरांनी धूम ठोकली . This bank has been broken seven times in the last few years
चोरांनी आपला माग मिळू नये म्हणून ग्रामपंचायत मधील CCTV आणि DVR ही सोबत नेला, मात्र गेल्या १५ वर्षांत ही बँक तब्बल ७ वेळा फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे सामान्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.
ML/KA/PGB
9 Dec 2023