बारमाही रस्ते जोडण्यासाठी तेराशे कोटींचा आराखडा

 बारमाही रस्ते जोडण्यासाठी तेराशे कोटींचा आराखडा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील डोंगरी तालुके , कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी सुमारे तेराशे कोटींचा आराखडा तयार करण्यात येत असून त्यातून ओढे , नाले यावरील छोटे पुल पक्क्या स्वरूपात बांधले जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. Thirteen hundred crore plan to connect perennial roads

पूर्वी केवळ लोखंडी असलेले हे साकव आता वाहतुकीसाठी देखील वापरता यावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे योजना सादर करण्यात आली त्यानंतर यासाठी आपत्कालीन निधीच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून दिले जातील असं मंत्री म्हणाले. रईस शेख यांच्या मूळ प्रश्नावर रवी पाटील, योगेश कदम , संग्राम थोपटे, प्रकाश आबिटकर आदींनी यावर उप प्रश्न विचारले होते.

महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव दरम्यानच्या तुटलेल्या पुलाच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून ते काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलं जाईल असं चव्हाण यांनी रईस शेख यांच्या प्रश्नावर स्पष्ट केलं. आता अशा साकवांसाठी एक कोटी पर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असं मंत्री चव्हाण यांनी सांगितलं.

ML/KA/PGB
28 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *