या राज्यात प्रजासत्ताक दिन संचलनात प्रथमच तृतीयपंथीयांचा समावेश

 या राज्यात प्रजासत्ताक दिन संचलनात प्रथमच तृतीयपंथीयांचा समावेश

बस्तर, दि. 25 (एमएमसी  न्यूज नेटवर्क) :  “बस्तर फायटर्स” हे छत्तीसगड पोलिसांचे विशेष युनिट आहे जे बस्तरच्या माओवादग्रस्त विभागात तैनात केले जाते.  यावर्षी प्रथमच  “बस्तर फायटर्स” चे तृतीयपंथीय  कर्मचारी उद्या जगदलपूर  येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतील, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या बाबत बोलताना बस्तरचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) पी सुंदरराज म्हणाले, “परेडमध्ये तृतीय लिंगाचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे या प्रदेशात सकारात्मक संदेश जाईल. बस्तर भागातील लोक या सर्व गोष्टींबद्दल खरोखरच उत्साहित आहेत”

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल हे देखील राज्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

SL/KA/SL

25 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *