या दोन तरुणी आहेत टाटा समुहाच्या वारसदार

 या दोन तरुणी आहेत टाटा समुहाच्या वारसदार

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा समूह (Tata group) हा देशातील सर्वात मोठा समूह आहे. रतन टाटा (Ratan tata) हे या समुहाचे प्रमुख आहेत. त्यांचे वारसदार म्हणून है साम्राज्य कोण सांभाळणार हे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी टाटा समुहाच्या वारसदारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात हे वारस संपूर्ण टाटा ग्रुपचा भार सांभाळतील. विशेष म्हणजे या वारसदार दोन्ही मुली असून, त्यांचे वय 40 वर्षेही नाही.

रतन टाटा यांचा धाकटा भाऊ नोएल टाटा यांच्या मुली या टाटा ग्रुपच्या वासरदार होण्याची शक्यता आहे. लीह, माया या दोन मुली आणि नेविल टाटा हा मुलगा आहे. हे दिघेही मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहतात. तसेच, रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. जेणेकरुन त्या भविष्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवसाय साम्राज्य हाताळू शकतील.

टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डाने 2 नोव्हेंबर 2022 रोजी लिया, माया आणि नेविल टाटा यांना समाविष्ट केले आहे. या तिघी सध्या रतन टाटा यांच्या मार्गदर्शाखाली काम करत आहेत. अंदाजे 3 हजार 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे रतन टाटा हे मालक आहेत. These two young women are heirs of the Tata group
SL/ KA/ SL
25 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *